कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असा इशारा आता मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला. ते चंद्रपुरात बोलत होते.
आता फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा कोरोना केसेस वाढल्याचं समोर येतंय. त्यामुळे लोकांमध्ये लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चा आहेत.महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीच्या दिवशी 3800 कोरोना केसेस समोर आल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी अजित पवार यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले.गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वाचा खुलासा केला. लॉकडाऊन हा आमच्यासाठी अंतिम पर्याय असेल, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना याबाबतचे आदेश दिले आहेत. हयगय नको, आवश्यक तिथे कंटेन्मेंट झोन तयार करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
लग्न आणि इतर जाहीर कार्यक्रमात होणारी गर्दी नियंत्रित करण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले. लोकांनी स्वयंस्फूर्तीने नियम न पाळल्यास अंशतः लॉक डाऊनचा विचार करावाच लागेल याचा पुनरूच्चार वडेट्टीवार यांनी केला.