महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यावरुन भाजप सातत्याने महाविकासआघाडीवर टीका करते आहे. कालच मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. या संवादामधून काहीही निष्पन्न निघाले नाही या अविर्भावात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
“संपूर्ण कोव्हीडच्या परिस्थितीमध्ये लोकांना कुणी त्रास देत असेल तर ते महाराष्ट्र आहे”. असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केले आहे. वाढत्या रुग्णसंख्येवरुनसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला आहे.
रुग्णसंख्या नेमकी महाराष्ट्रातच का वाढते आहे? ऐवढ्या झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असतांना काय ऊपाययोजन केल्या जात आहे? यावर मुख्यमंत्र्यांनी बोलणे आवश्यक होते. नागपूर, पुणेसारख्या शहरांची स्थिती गंभीर आहे. बेड्स नाहीत, रुग्णांची व्यवस्था नाही यावर मुख्यमंत्र्यांनी ऊत्तरं द्यायला हवी होती.
महाराष्ट्र सरकारने अजूनही कुठलेही पॅकेझाहीर केलेले नाही. केंद्राने गेल्या वर्षी २० लाख कोटींच पॅकेज जाहीर केलं, ईतर राज्यांनीसुद्धा पॅकेजं दिलीत. महाराष्ट्रात मात्र काहीच दिले गेले नाही. वरुन शेतकर्यांची लाईन कापली जात आहे. अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांनी सत्ताधार्यांचा समाचार घेतला आहे. नागपुरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.