सचिन वाझे यांच्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शिवसेनेवर शंका

12

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. सचिन वाझे यांनी 2008 साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे मुंबईत स्फोटकांनी कार सापडलेल्या मनसुख हिरेन यांच्या प्रकरणाचा गूढ अधिकच वाढले आहे.

या प्रकरणाचा तपास एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांच्याकडे का देण्यात आला, असा सवाल भाजपनंतर आता मनसेनंही उपस्थितीत केला आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस ह्या त्यांच्या कडेच का सोपवल्या जातात? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून, या प्रकरणात विरोधकांकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचंही नाव घेतलं जात आहे.