सध्या सपुंर्ण देशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरताना दिसत आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, नवी दिल्ली आणि कर्नाटकाने आपल्या राज्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. आता त्या पाठोपाठ गोवा राज्याने सुद्धा पाच दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे, उद्यापासून पाच दिवसांचे लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. गोवा हे कर्नाटकनंतर दुसरे भाजपाची सत्ता असलेले राज्य आहे जिथे लॉकाडाऊन करण्यात आले आहे.
या संदर्भातील माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांनी सुद्धा लॉकडाऊन जाहीर केला आहे. गोव्यातील सार्वजनिक वाहतूक पूर्ण बंद राहील. मात्र उद्योगधंदे सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. २९ एप्रिल ते ३ मे या कालावधीत हा लॉकडाऊन असणार आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये. सर्व अत्यावश्यक सेवा आणि किराणा मालाची दुकाने सुरु राहतील. स्थलांतरीत मजुरांनी राज्य सोडू नये असेही आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.
लोकांनी जर पुढचे पाच दिवस कडक लॉकडाऊनचे पालन केले तर संसर्गाची साखळी तोडण्यात आपल्याला यश मिळेल असे मुख्यमंत्री म्हणाले. लॉकडाऊनची सविस्तर नियमावली लवकरच जाहीर करू असेही त्यांनी सांगितले. कॅसिनो, बार लॉकडाऊनच्या कालावधीत बंद राहतील. तर रेस्टॉरंट फक्त पार्सल सुविधा देऊ शकतात. अत्यावश्यक सेवांसाठी राज्यात येण्यास किंवा जाण्यासाठी बंदी नसेल असेही सांगण्यात आले आहे.