स्थायी समितीत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी झाल्यास महापालिका निवडणुकीतही तोच फॉर्म्युला कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.शिक्षण, महिला व बालकल्याण, शहर सुधार, वैद्यकीय, विधी या समित्यांवर शिवसेना दावा ठोकणार असल्याने भाजपच्या गटात खळबळ उडाली आहे.
स्थायी समितीत भाजपचे संख्याबळ एकने घटल्याने सत्ताधारी व विरोधकांचे समसमान बल होणार असल्याने शेवटच्या वर्षात भाजपकडून स्थायी समितीची सत्ता हस्तगत करण्याची संधी निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची मंगळवारी बैठक होणार आहे.
स्थायी समितीवर तौलनिक संख्याबळाच्या आधारे एक अतिरिक्त सदस्य नियुक्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेस्थायी समिती सभापतिपदासाठी रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे.
सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपचे आठ व विरोधकांचे आठ सदस्य राहणार आहेत. त्या अनुषंगाने स्थायी समिती काबीज करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे.
स्थायी समितीत भाजपचे नऊ, शिवसेनेचे चार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. मात्र, भाजपचे महासभेतील संख्याबळ दोनने घटल्याने सदस्यसंख्या ६४ पर्यंत आली आहे.