मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. यावरुनच मुंबई ऊच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचे सीबीआय चौकशीचे आदेश दिले. परिणामी अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला अाहे. परंतू राज्य सरकारने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आव्हानात्मक याचीका दाखल केली आहे.
अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपावरुन मुंबई ऊच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान ऊच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. ऊच्च न्यायलयाच्या या आदेशांना राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. त्यापाठोपाठ अनिल देशमुखसुद्धा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
गृहमंत्रीपदाचा राजिनामा दिल्यानंतर अनिल देशमुख हे दिल्लीला रवाना झाले होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधीज्ञ्ज अभिषेक मनु सिंघविु यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन अनिल देशमुख यांनी भेट घेतली. आणि त्यानंतर याचिका दाखल केली आहे.
राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आव्हानात्मक याचिकेवरुन भाजपने सरकारवर टीकेच्या तोफा डागण्यास सुरुवात केली आहे. अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी मुंबई ऊच्च न्यायालयात याचिका दाखल करणार्या अॅड. जयश्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केली अाहे.