प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरचं नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या नव्या प्रोजेक्टच्या शुटिंगची देखील सुरवात झाली आहे. हा एक क्राईम थ्रिलर सिनेमा आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी NH Studioz ने स्वीकारली आहे. आजवर बेगम जान, ओमर्ता, पिंक, शिवाय यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटाची निर्मिती करणारा हा स्टुडिओ आहे. हा स्टुडिओ आता मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे.
28 ऑक्टोम्बर रोजी या चित्रपटाचा पाहिला सीन शूट करण्यात आला आहे. याच्या चित्रीकरणाला मुंबई येथे सुरवात झाली आहे. 2021 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, ” गेली कित्येक वर्षे मी या सिनेमाच्या कथेचा विचार करत होतो. जणू माझ्या डोक्यात ही कथा बंदिस्त होती. मी विजयला सहज भेटलो होतो, तेव्हा त्याला ही कथा ऐकवली. कथा ऐकल्यावर विजय खुश झाला. त्याने चित्रपट करण्याची इच्छा ही व्यक्त केली. त्यांनी ही कथा एन एच स्टूडिओजचे निर्माते नरेंद्रजी यांना ऐकवली. त्यांनीही निर्मितीसाठी होकार कळवळा. आता सिनेमाच्या शुटिंगची सुरवात झाली.
दरम्यान, महेश मांजरेकरांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे असेही त्यांनी व्यक्त केले. तो साकार होत आहे याचा मला आनंद आहे असेही त्यांनी सांगितले. त्यांनी निर्माते आणि सहनिर्मात्यांचे देखील आभार मानले आहे.