भाऊबीजेच्या दिवसाचं औचित्य साधून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडनविस यांनी नवीन गाणे पोस्ट केले आहे. “तिला जगू दया”, हे गाणं पोस्ट करत, अमृता फडणवीस यांनी सर्व भावांकडे मागणी केली आहे. परंतु यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत अमृता फडणवीसांवर भरपूर टीका केल्या आहेत.
‘हिला नको गाऊ द्या’… असे म्हणत मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी अमृता फडणवीसांवर टीका केल्या. सोशल मिडियावर हे गाणं प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर यांनी याबाबत एक मोठी पोस्ट केली आहे. टिळेकरांनी या पोस्टमध्ये, अनेक चांगल्या आवाजाच्या गायकांना पुढे येण्याची संधी मिळत नाही. जर फडणवीसांकडे अतिरिक्त पैसा असेल तर त्यांनी नवोदित गायकांना चांगल्या संगीत शिक्षणाची संधी द्यावी. अमृता यांनी स्वतः मात्र गाऊ नये अशी कळकळीची विनंती आहे असे यामध्ये लिहले आहे.
महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना संधी मिळत नाही, पण हिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती वाटते, लाखो तरुणांच्या हृदयात धडकी भरते. गाण्याने आनंद मिळण्याऐवजी दुःख होते. अशी आपल्या विश्वात धुंद होऊन गाणारी विश्वगायिका लोकांना नेहमी का छळत आहे? “गायी म्हशींच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ सहन करतील पण हा आवाज कानांना सहन होत नाही”, असं म्हणत त्यांनी अमृता फडणवीस यांना खरचं गाता येतं का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.