गेल्या महिन्यात लॉन्च झालेली महिंद्रा थार 2020 ची; दिवाळीच्या मुहूर्तावर रेकॉर्डब्रेक विक्री

7

महिंद्राने महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी त्यांची लोकप्रिय एसयूव्ही महिंद्रा ‘THAR 2020’भारतात लाँच केली होती. या ‘सेकंड जनरेशन महिंद्रा THAR 2020’ ची किंमत 9.8 लाख रुपयांपासून सुरु होते. महिंद्रा थारचे एलएक्स ट्रिम हे टॉप मॉडेल 13 लाख रुपयांपर्यंत बाजारात विक्रीस उपलब्ध आहे.

महिंद्राची सेकंड जनरेशन थार ही एसयूव्ही भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीत कंपनीने थार लाँच केली. कोरोना महामारीमुळे लोकांची बिघडलेली आर्थिक परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे या कारच्या विक्रीबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. परंतु Mahindra THAR 2020 ने सर्वांचे अंदाज चुकवले आहेत. या गाडीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मागणी वाढल्यामुळे कंपनीने त्यांच्या नाशिक येथील प्लांटला प्रोडक्शन वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

महिंद्रा कंपनीने गेल्या आठवड्यात फक्त दोन दिवसात थारच्या 500 युनिट्सची डिलीव्हरी केली आहे. कंपनीने कार लाँच करताना यावर्षाच्या अखेरपर्यंत 2000 युनिट्सच्या विक्रीची योजना बनवली होती. परंतु आता मागणी वाढल्याने 2021 पूर्वी 3000 हूनही अधिक युनिट्सची विक्री होईल. असं कंपनीने सांगितलं आहे. महिंद्राची ही नवी थार ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.