तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरी शहराला बसला आहे. अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळानंतर नागरिकांना मदतीची गरज असते हे लक्षात घेऊन भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे सोमवारी रत्नागिरी मध्ये दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी मंगळवारी रत्नागिरी शहराचा दौरा सुरू केला
परिस्थितीची पाहणी करताना कुणाला मदत कर असे सांगत न राहता निलेश राणे यांनी स्वतः वादळग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला. नाचणे येथे मनोज खांबकर यांच्या घरांच आणि रिक्षाच नुकसान झालं आहे. निलेश राणे यांनी तत्काळ स्वरूपाची मदत करत दिलासा दिला.
आता फक्त आदेशाची नव्हे तर लोकांच्या अडचणीत त्यांच्या सोबत उभं राहण्याची गरज आहे हे निलेश राणे यांनी दाखवून दिले. यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते राजन देसाई, नित्यानंद दळवी, नंदू चव्हाण यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायत सदस्य सौ फडके, ओंकार फडके आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.