राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप करत ऊद्धव ठाकरेंनी सुनावले भाजपला खडेबोल!

18

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तीसरा दिवस काल(दि.३ मार्च) पार पडला. यादरम्यान विरोधकांकडून विविध मुद्द्यांना हात घालत सत्ताधारी महाविकासआघाडीवर शरसंधान साधण्यात आले. त्यानंतर मात्र राज्यपालांच्या अभिभाषावर बोलतांना मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे य‍ांनी भाजपला चांगलेच सुनावले. भाजपला भारत माता की जय म्हणण्याचा अधिकार नाही. शिवसेना स्वातंत्र्यलढ्यात नव्हती, पण तुमची मातृसंस्था असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघसुद्धा स्वातंत्र्यलढ्यात कुठेच नव्हता असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबात विधान करत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सराकारवरसुद्धा कडाडून टीका केली. भाजपचे हिंदुत्व हे भ्रष्ट होंदुत्व आहे. आम्हाला हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवण्याची त्यांची पात्रतासुद्धा नाही. बाबरी पाडल्यानंतर हिंदुत्वाचा पुळका असणारे हे पळून गेले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ठामपणे ऊभी होती. “काश्मिरमध्ये फुटिरतावाद्यांच्या मांडीला मांडी लाऊन हे सत्तेत बसले होते. तेव्हा कुठे गेले होते हिंदु्त्व” असेसुद्धा ऊद्धव ठाकरे म्हणाले.

चीन मुद्द्यावरुनसुद्धा त्यांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांच्या मार्गात खिळे आणि चिनसमोर पळे असे ऊद्गार त्यांनी यावेळी काढले. राममंदिरनिर्मितीसाठी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा केली जात आहे. मात्र त्यामध्येसुद्धा नाव आमचेचे झाले पाहिजे हा भाजपचा आटापीटा आहे.

अौरंगाबादचे संभाजीनगर हे नाव जरुर बदलू, परंतू याअगोदर विमानतळाचे संभाजी महाराज विमानतळ हे नाव केंद्र सरकारने करावे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देणे हे केंद्राच्या हातात आहे, राज्याच्या नाही असेही ते यावेळी म्हणाले.