पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार ‘मां की रसोई’ ही योजना सुरू करणार आहे. काही दिवसांपूर्वी गौतम गंभीर यानंदेखील दिल्लीत जन रसोईची सुरूवात केली होती.
निवडणुकांपूर्वी ममता बॅनर्जी यांचं सरकार ‘मां की रसोई’ हे योजना घेऊन येत आहे. या योजनेअंतर्गत गरीबांना केवळ पाच रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना डाळ, भात, एक भाजी आणि अंड देण्यात येणार आहे. सोमवारी १५ फेब्रुवारी रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गौतम गंभीर यांनी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून दिल्लीतील गांधीनगर येथे जन रसोईची सुरूवात केली होती. याअंतर्गत लोकांना केवळ एका रूपयात भोजनाचा आस्वाद घेता येतो. कोरोना महासाथीच्या दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या जन रसोईमध्ये सर्व नियमांचं पालनही केलं जातं.
सध्या कोलकात्यातील १६ बोरो कार्यालयात दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली जाईल. या योजनेअंतर्गत प्रत्येक ठिकाणी जवळपास एक हजार लोकांना दुपारचं जेवण देण्यात येणार आहे. हळूहळू कोलकात्याच्या बाहेरही या योजना सुरू करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.