ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगाल अन्य राज्यांच्या तुलनेत मागे पडले: अमित शहा

13

आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून अमित शाह यांनी हावडा येथील एका रॅलीला संबोधित केले.त्यावेळी राज्याचा विकास करण्याचे सोडून ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगाल अन्य राज्यांच्या तुलनेत मागे पडले, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. 

केवळ एका कागदाने काही होत नाही. त्यासोबत शेतकऱ्यांची यादी पाठवायला हवी. बँक खात्यांचा तपशील हवा. यापैकी काहीच पाठवले नाही,ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी आमच्याकडे एक कागद पाठवला होता. त्यात पश्चिम बंगालमध्ये शेतकरी सन्मान योजना लागू करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. मात्र, केवळ कागदी घोडे नाचवून काही फायदा नाही.अशी टीकाही अमित शहा यांनी केली.

माटी माटी मानुष’ असा नाराही देत पश्चिम बंगालचा चेहरा-मोहरा बदलण्याचे आश्वासन दिले. मग असे काय घडले की, आता मोठ्या प्रमाणावर तृणमूल काँग्रेसला भगदाड पडत आहे, अशी विचारणाही अमित शाह यांनी यावेळी केली

अलीकडेच तृणमूल काँग्रेसला रामराम केलेले माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह अनेक बंडखोर आमदार आणि नेत्यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार येताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव आणून पश्चिम बंगालमधील जनतेला या योजनेचा लाभ मिळवून देऊ, असे आश्वासन अमित शाह यांनी यावेळी दिले.