केंद्रीयमंत्री बाबूल सुप्रियो यांनी आज(शुक्रवार) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. “बंगालमधील वातावरणाला आता बदलावं लागेल, ममता बॅनर्जी देवांचीही वाटणी करू इच्छित आहे. त्यांनी संघराज्य रचनेची हत्या केली आहे.” असं त्यांनी म्हटलं आहे.
लोकांना माहिती आहे की आज बंगालला काय हवं आहे. बंगालला एक स्वच्छ सरकार हवं आहे.” असं देखील बाबूल सुप्रियो यांनी म्हटलं आहे. आगामी काळातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावर तापलं आहे.
तृणमूल काँग्रेस काय आहे? केवळ नावात ऑल इंडिया लावल्याने राष्ट्रीय पार्टी बनत नाही. या वस्तूस्थितीपासून ते पळण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी टीका बाबुल सुप्रियो यांनी केली आहे.इंडिया टुडे कॉन्क्लेव ईस्ट २०२१ च्या दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात ते बोलत होते.
ममता बॅनर्जी स्वत: घाबरल्या असल्याने त्या सतत म्हणत आहेत की, जो डर गया वो मर गया.यावरून त्यांच्या आतील भीती दिसते. त्यांनी बंगालला जे वचन दिलं होतं, त्याच्या बरोबर उलटं केलं आहे.” असंही बाबूल सुप्रियो यांनी विविध प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले.
पोरीबोर्टन यात्रेबाबत ममता बॅनर्जींनी केलेल्या विधानावरील प्रश्नावर बोलताना बाबूल सुप्रियो म्हणाले, मी अशा कोणत्याही गोष्टीवर उत्तर कसं देऊ शकतो जी खोटी आहे.