तृणमूलचे आमदार शीलभद्र दत्त यांनी देखील पक्षाला रामराम ठोकला आहे. याआधी मंत्री सुवेंदु अधिकारी आणि जितेंद्र तिवारी यांनी गुरुवारी आपला राजीनामा दिला होता.ममता बॅनर्जींना आणखी एक झटका बसला आहे.भाजपामध्ये सामिल होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सुवेंदु अधिकारी हे जर भाजपमध्ये सामिल झाले तर ते भाजपसाठी फायद्याचं ठरणार आहे. कारण 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या विजयात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. सुवेंदु अधिकारी हे राज्याच्या पश्चिम भागातील 50 हून अधिक जागांवरील स्थानिक नेत्यांवर चांगले नियंत्रण ठेवून आहेत, असं म्हटलं जातं. तृणमूलला मोठ्या धक्क्याला सामोरे जावे लागत आहे. तृणमूल सोडणारे आणि भाजपच्या वाटेवर असणाऱ्या तृणमूलच्या नेत्यांची यादी दिवसागणिक वाढतच चालली आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा आहे.पश्चिम बंगालमध्ये आपलं सरकार आणण्यासाठी भाजपाने आतापासूनच जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.शहा यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये सामिल होतील का हे पाहणं निर्णायक ठरणार आहे.