राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही निर्बंध लागू केले आहेत. राज्यात आता मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
तसेच केंद्रावरसुद्धा निशाणा साधला आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असून केंद्र सरकार आमच्या वाट्याचा ऑक्सिजन घेऊन जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय राज्यात डीजीपी आणि एडीजींच्या बदल्याही त्यांनी केल्या.
राज्य सरकारच्या कार्यालयांमध्ये फक्त 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल. शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिम, सिनेमागृहे, ब्युटी पार्लर बंद करण्यात येत असून कोणत्याही समारंभांना, कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही.असेही त्या म्हणाल्या.