आज दिंडोरी येथील मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाच्या सुरु असलेल्या कामांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या समवेत पाहणी केली.
तसेच भविष्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून भविष्यात मराठवाड्यासह महाराष्ट्राची तहान भविण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले.
मांजरपाडा प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. दायित्वाला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्य धरणाचे अपूर्ण असलेले काम हे काम गेल्या महिनाभरापूर्वी सुरु करण्यात आले आहे. सद्य स्थितीत प्रकल्पाचे काम ८७ टक्क्यांपेक्षा काम झाले असून मे २०२१ अखेर पर्यंत या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे.
तसेच छगन भुजबळ व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वणी गावातील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला.