राज्यात सध्या कोरोना ऋग्नसंख्या वाढत आहे. माणसं माणसांना घाबरत आहेत. मात्र, याही परिस्थितीत माणसातील माणूसपण हरवलेलं नाही. याचीच परीचीती आली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड ते पालम रस्त्यावर आरके मंगलकार्यालयाजवळ बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास एक हरिण जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला विव्हळत होते.
तो प्रकार सामाजिक कार्यकर्ते सखारामजी बोबडे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने गंगाखेड येथील पशूवैद्यकीय विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अली यांना मोबाईलद्वारे तो प्रकार कळविला.
पाठोपाठ गंगाखेड येथील पशूवैद्यक विभागातील अधिकारी कर्मचार्यांनी घटनास्थळावर धाव घेईपर्यंत पाठपुरावा केला. तसेच वन विभागाच्या हेल्पलाईनवर या अनुषंगाने माहिती उपलब्ध केली.
त्यामुळे पशूवैद्यक विभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी जावून जखमी अवस्थेतील त्या हरिणास ताब्यात घेतले व त्यास गंगाखेडात आणून प्रथमोपचार केले. त्यास तातडीने पुढील उपचाराकरीता परभणीस रवाना केले आहे.