मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक पदार्थ असणार्या जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिअो कार आढळली होती. या कारमध्ये धमकी देणारी चिठ्ठीसुद्धा होती. या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा काल मुंब्रा परिसरातील खाडीमध्ये मृतदेह आढळून अाला. यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाकडे लागले. मनसुख यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगीतले. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी आत्महत्या करण्याच्या पोलिसाच्या दाव्यास स्पष्ट नकार दिला आहे. ही हत्या की आत्महत्या असा प्रश्न पडला असतांनाच मनसुख यांनी थेट गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहील्याचे ऊघड झाले आहे.
पत्रामध्ये मनसुख हिरेन यांनी गाडी चोरीच्या आणि त्यानंतर अंबानींच्या घरासमोर कार आढळल्याने करण्यात आलेल्या चौकशीचा संपूर्ण तपशील सांगीतला आहे. मी पिडीत असून मलाच पोलिसांकडून आरोपीसारखी वागणुक दिली जात असल्याची व्यथा त्यांनी मांडली आहे. तसेच या पत्रामध्ये विक्रोळी पोलिस स्टेशन, क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे, एनअायए, घाटकोपर पोलिस स्टेशन, वरिष्ठ अधिकार्यासह एका पत्रकाराचा ऊल्लेख केला आहे.
१७ फेबृवारील ठाण्याहून मुंबईला जात असतांना माझ्या कारमध्ये बिघाड झाला. त्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर नाहुर ऊड्डाणपुलाजवळ गाडी पार्क केली आणि तेथून निघून गेलो. दुसर्यादिवशी त्याठिकाणी पोहचलो असता गाडी तिथे नव्हती. त्यामुळे मी विक्रोळी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यानंतर गाडी अंबानी यांच्या घरासमोर अाढळ्याचे एकुन मला धक्काच बसला. त्यानंतर माझ्यामागे चौकशीचा ससेमीरा लावण्यात आला.
२५ फेबृवारीच्या रात्री एटीएसच्या पोलिसांकडू गाडी स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत अंबानी यांच्या घरासमोर आढळल्याचे मला कळाले. २६ फेबृवारीला रात्री दोन वाजता मला विक्रोळी पोलिस स्टेशनचे पोलिस घेऊन गेले आणि सकाळी ६ ला परत सोडले. पोलिसांनी मला आरोपीसारखी वागणुक दिली. पत्रकारांनीसुद्धा मला वारंवार फोन केलेत. मला या त्रासातून मुक्तता मिळावी, पोलिस आणि पत्रकारांपासून संरक्षण मिळावे. त्यांना माझा अशाप्रकारे छळ करण्याचा कुठलाही अधिकार नाही. असे मनसुख हीरेन यांनी आपल्या पत्रात लिहीले आहे. आता घटनेचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे.