‘अनेक शेतकऱ्यांना कृषी कायद्याबद्दल माहिती नाही; अन्यथा देश पेटून उठला असता’

25

केंद्रातील तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता दोन महिने होऊन गेले आहेत. तरीही कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करत आहेत.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढत असलेला पाठिंबा पाहता सरकारने धास्ती घेतल्याचं सध्या चित्र आहे.  प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण मिळाले होते.

सदरील हिंसाचार प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील सुरु आहेत. देशातील बहुतांश शेतकऱ्यांना कृषी कायद्यांची माहिती नाही. अन्यथा सगळा देश पेटून उठेल, असा दावा खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. ते वायनाड मध्ये बोलत होते.

केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे रद्द करावेत देशभरातील बहुतेक शेतकऱ्यांना केंद्रीय कृषी कायदे, या कायद्यातील तरतुदी, कायद्यातील नियम यांविषयीची माहिती नाही. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना त्याची नीट माहिती झाली, तर देशात मोठे आंदोलन होईल. सगळा देश पेटून उठेल.