करोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका. कोरोनाची साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचणार आहेत. त्यामुळे हा विषय सर्वांनी गांभीर्याने घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले.
सद्यस्थितीत बारामती तालुक्यात शासन आणि प्रशासन यांच्यामार्फत विविध उपाययोजना करून देखील बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब चिंतेची असून साखळी तोडण्याचा विषय सर्वांनी गांर्भीयाने घेणे आवश्यक आहे. असेही पवार म्हणाले.
पुण्यातील बैठकीमध्ये चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्याबाबत आज रात्री किंवा रविवार सकाळी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात करोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक’ पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.