मराठा क्रांती मोर्चाकडून मंत्री विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड तसेच नितीन राऊत यांच्या भूमिकांबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.पदोन्नतीतील आरक्षणावरून काँग्रेसने 7 मे रोजी पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे.काँग्रेसने जातीयवादी भूमिका सोडावी अन्यथा काँग्रेसला फक्त मागासवर्गीय समाजाने मतदान करावे व मराठा समाजाने मतदान करू नये असे जाहीर करावे, अशा शब्दांत मराठा क्रांती मोर्चाने आपला संताप व्यक्त केला आहे.
मराठा समाजाबद्दल एवढा द्वेष जर काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये असेल तर मराठा समाज येणाऱया निवडणुकीत या पक्षाला योग्य ती जागा दाखवेल, असा इशारा मराठा मोर्चाकडून देण्यात आला आहे.
राज्यात जाती जातींमध्ये वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही काँग्रेस पक्षाची राहील, असे सांगताना जातीय मतभेदांसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून सर्वस्वी काँग्रेसला जबाबदार धरण्यात आले आहे.