मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना रोहित पवारांचा सल्ला !

23


मुंबई : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. आता या निर्णयानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी याच मुद्द्याचे राजकारण करत एकमेकांवर चिकलफेक सुरु केली आहे.


यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवारांनी सत्ताधारी आणि विरोधकांना मोलाचा सल्ला दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, त्यावर कोणीही राजकारण करू नये मराठा समाजातील युवावर्गाला काय मदत करता येईल याबाबत सत्ताधारी व विरोधकांना एकत्र बसून निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिलेली आहे. ते निर्णयानंतर पत्रकार माध्यमांशी बोलताना बोलत होते.


मराठा आरक्षणाचा लढा हा मराठा समाजाने उभा केलेला एक मोठा लढा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते तर चांगलेच झाले असते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो. या न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिलेला आहे. पूर्वीच्या सरकारने जे विधी तज्ञ नेमलेले होते, तेच विधी तज्ञ याही सरकारने कायम ठेवलेले आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांनी याबाबत कुठल्या प्रकारचे राजकारण करू नये.


मराठा समाजातील तरुण पिढीला शैक्षणिक उद्योग यासह विविध क्षेत्रामध्ये काय मदत करता येईल ,याबाबत दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी बसून निर्णय घ्यावा कारण मराठा समाजाचा मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा हा या समाजाने उभा केलेला एक मोठा लढा आहे. त्यामागे कुठल्याही प्रकारची राजकीय शक्ती नाही. तो एक समाजाचा प्रश्न आहे मुळे या समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी बोलून दाखविले होते.