‘या’ मराठी अभिनेत्याचा बॉलीवूडमध्ये बोलबाला, ‘त्रिभंगा’ चित्रपटातील काजलसोबत फोटो व्हायरल

15

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनात करणारा जागा करणारा अभिनेता वैभव तत्ववादी. त्याने या पूर्वीही ‘बाजीराव-मस्तानी आणि ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ सारख्या सुपरहिट हिंदी सिनेमामध्ये भूमिका साकारली होती. तो आता त्रिभंगाः टेढी मेढी क्रेजी या सिनेमातून वैभव मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर अभिनेत्री काजलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. वैभव लवकरच ‘त्रिभंगा’ या चित्रपटात काजलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्रिभंगा हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्स (Netflix) या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून यातील वैभवची विशेष भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.

वैभवने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा त्यांचा एकत्र फोटो शेअर केलेला आहे. या फोटोमध्ये वैभवने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे आणि काजलने पिंकीश-रेड कलरच्या कॉम्बिनेशनचा वनपीस घातलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करत वैभवने लिहिले आहे की, अनू आणि रोबिंद्र.हॅशटॅग त्रिभंगा..!असे कॅप्शन दिले आहे. यावरुन समजतं की काजल आणि वैभव ‘अनू’ आणि ‘रोबिंद्र’च्या भूमिकेत दिसणार आहेत.

त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरपुर प्रतिक्रिया दिल्या असून शुभेच्छा देखील दिल्या आहेत. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण झाले आहे. वैभवने सेटवरील शेवटच्या दिवसाचा व्हिडिओही इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्रिभंगा हा सिनेमा काजोल, तन्वी आझमी आणि मिथिला पालकर यांच्याभोवती फिरणारी तीन पिढ्यांच्या आई-मुलीची ती कहाणी आहे. यातील वैभव तत्ववादी त्याच्या उत्तम अभिनयामुळे चर्चेत आहे.