मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरचे दिवाळी स्पेशल फोटोशूट व्हायरल

33

आपल्या सौंदर्याने, नृत्याने, फॅशन आणि अनोख्या स्टायलने घायाळ करणारी मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर पुन्हा एकदा स्वतःच्या लुकमुळे चर्चेत आली आहे. अमृता सध्या दिवाळीचा आनंद घेत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अमृताने खास पारंपरिक वेशभूषा करून फोटो शूट केलं आहे. लाल रंगाच्या साडीने अमृताचे रूप अजून उठून दिसत आहे. दिवाळीची रोषणाई अवतीभोवती आहे.

फोटो शेअर करत कॅपशनमध्ये तिने, चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनी देखील कमेंटच्या माध्यमातून तिला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे अनेक सेलिब्रिटिंनी दिवाळी पार्टी रद्द केली आहे. आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. अमृताने मराठीसोबत हिंदी इंडस्ट्रीमध्येही नृत्य आणि अभिनयाची छाप उमटवली आहे. आपल्या अभिनयामुळे अमृता नेहमी चर्चेत असते.