अभिमानास्पद! मराठमोळ्या श्रुतिका मानेने पटकावला ‘ऑस्ट्रेलिया मिस इंडियाचा’ किताब

19

ठाण्यातील डॉक्टर संदीप माने यांची मुलगी मराठमोळी श्रुतिका माने ही ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत पहिली आली आहे. श्रुतिका हिचा जन्म इंग्लडला झाले असेल तरीही त्यानंतर ठाणे येथे आल्यावर सिंघानिया स्कूलमधून पुढील शालेय शिक्षण पूर्ण केले. श्रुतिका सध्या ऑस्ट्रेलिया येथील ॲडलेड विद्यापीठातून ॲडव्हान्स हेल्थ ॲन्ड मेडिकल सायन्सची पदवीचे शिक्षण घेत आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईत होणा-या मिस इंडिया जागतिक स्पर्धेसाठी श्रुतिका ऑस्ट्रेलियातर्फे प्रतिनिधीत्व करणार आहे.

दरवर्षी ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या भारतीय तरूणींसाठी ‘मिस इंडिया स्पर्धे’चे आयोजन करण्यात येते. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर ‘मिस इंडिया स्पर्धे’च्या अंतिम फेरीत निवड झालेल्या 7 स्पर्धकांची ऑनलाईन ऑडिशन व मुलाखत घेण्यात आली होती. 2001 साली सिडनी-ऑस्ट्रेलिया येथे राहत असलेले राज सुरी यानी या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेला सुरवात केली. त्यांनी या स्पर्धेबद्दल देखील मार्गदर्शन केले. श्रुतीकाने कत्थक नृत्याचे शिक्षण घेतले असून अनेक वक्तृत्व स्पर्धेत तिने यश संपादन केले आहे. तिला अभिनयाची आवड आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबई येथे होत असलेल्या मिस इंडिया जागतिक स्पर्धेसाठी श्रुतिका माने ऑस्ट्रेलियातर्फे प्रतिनिधीत्व करणार आहे.

आपल्या स्पर्धेतील यशाबद्दल श्रुतिका म्हणाली, मिस इंडिया ऑस्ट्रेलियासाठी माझी निवड झाली ही माझ्या दृष्टीने आनंदाची व अभिमानाची बाब आहे. हा मुकुट म्हणजे एक जबाबदारी असल्याची जाणीव मला आहे. भविष्यात आणखी काय असेल याची उत्सुकता मला लागली आहे. महाराष्ट्रातील बंधू भगिनींचा पाठींब्यामुळेच मी हे यश मिळवू शकले. जागतिक स्तरावर भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करणे, त्यांच्यातील सामर्थ्य व कलागुण जगासमोर आणणे हा या स्पर्धेत भाग घेण्याचा उद्देश होता असे ती म्हणाली. तर श्रुतिकाचे वडील डॉ.संदीप माने व आई डॉ राजश्री माने हे आयव्हीएफ स्पेशॅलिस्ट आहेत. मुलीच्या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, मुलीच्या यशाबद्दल आम्हाला आनंद झाला असून मुली देखील सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत. मुलींच्या कतृत्वाला साथ दिली पाहिजे