बीड जिल्ह्यातील 131 मतदान केंद्रांवर मतदानाची अंदाजे अंतिम टक्केवारी 62.08 जिल्ह्यात उत्साहात व शांततेत मतदान संपन्न झालं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 साठी आज सकाळी 8 वाजता मतदान उत्साहात व शांततेत सुरुवात झाली, सायंकाळी 5 पर्यत मतदान बजावण्यासाठी नागरीकानी मोठ्या प्रमाणात रांगा लावण्यात आल्याचे दिसून आले होते. जिल्ह्यातील 131 मतदान केंद्रांवर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे अंतिम टक्केवारी 62.08 झाली होती.
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात उत्साहात मतदान झाले. परळी , गेवराई , माजलगाव, बीड, आष्टी, केज, अंबाजोगाई, वडवणी, धारुर, शिरुर कासार, पाटोदा या प्रमुख शहरासह जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
जिल्ह्यामध्ये पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी पुरुष 50310, महिला 13126 अशी एकूण 63 हजार 126 इतकी मतदारसंख्या आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यत प्राप्त झालेल्या अंदाजानुसार एकूण 39 हजार 382 मतदारांनी मतदान केले असून झालेल्या मतदानाची अंदाजे अंतिम टक्केवारी 62.08 इतकी आहे. सदर अंदाजे टक्केवारी सर्व मतदान केंद्रांचे अंतिम अहवाल पडताळून पाहिल्यानंतर अधिकृत आकडेवारी अंतिम केली जाणार आहे.