मराठवाडा पदवीधर निकाल : सतीश चव्हाण आघाडीवर, बोराळकर पिछाडीवर

19

पोस्टल मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांना 600 मते, तर भाजपचे शिरीष बोराळक यांना 286 मते मिळाले आहे. यात चव्हाण यांनी 314 मतांनी आघाडी घेतली आहे. पोस्टलची एकूण 1248 मते आहेत. त्यातील 175 अवैध ठरली आहेत.

पहिली फेरी सायंकाळी साडेसहा वाजता संपली. पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं. प्रथमफेरी अखेर राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांना 27879 मते तर प्रतिस्पर्धी उमेदवार बोराळकर यांना 10973 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांनी 16906 मतांची दणदणीत आघाडी मिळवली आहे.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली होती. पहिल्या फेरीचा निकाल संध्यकाळी ,साडेसहा वाजता हाती आला आहे. पुढच्या फेरीचा निकाल कदाचित उदय येण्याची शक्यता आहे.