MARCO | मार्को ॲक्शनपटाचा बाप !

37

अनिल / वर्तमान

दाक्षिणात्य चित्रपटांचा वाढता क्रेझ आता बॉलिवूडला मागे टाकायला लागलाय, याचे उत्तम उदाहरण महणजेच “पुष्पा2” हा चित्रपट या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत सगळ्याच चित्रपटांना मात दिली आहे, अजूनही हा चित्रपट चित्रपटगृहांत धुमाकूळ घालतच आहे.

पुष्पा ची क्रेझ उतरली नाही तोच मल्याळम इंडस्ट्रीच्या “मार्को” या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे, पुष्पाच्या वादळातही “मार्को” ने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि ‘हिंदी डब” “मल्याळम चित्रपट” म्हणून सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

हल्ली “मल्याळम इंडस्ट्रीतून” दर्जेदार चित्रपट यायला लागले आहेत, मार्को हे त्याचे उत्तम उदाहरण आहे याची तुलना “रणबीर कपूरच्या” “ॲनिमल” शी केली जातेय काही लोक तर यातील ॲक्शन दृष्यांच्या अक्षरशः प्रेमात पडले आहेत, सिनेमाचं “कथानक, पटकथा आणि ॲक्शन” जमेची बाजू आहे, या चित्रपटातील ॲक्शन फारच हिंसक आहेत त्यामुळे लहान मुलांसाठी ते योग्य नाहीत आणि म्हणून चित्रपटाला “A” प्रमाणपत्र मिळालं आहे. “हिंसक ॲक्शन दृश्यांच्या” बाबतीत सध्यातरी याच चित्रपटाला “बाप” मानलं जातंय…

अभिनेता “उन्नी मुकुंदन” आणि “कबीर दुहान सिंग” यांनी या चित्रपटात उत्तम भूमिका साकारल्या आहेत, चित्रपटाचा सर्वत्र कौतुक होत आहे , एकदा चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहायला काही हरकत नाही

Marco Movie Teaser