लासुर स्टेशन प्रतिनिधी संजय शर्मा
गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील मावळा प्रतिष्ठान च्यावतीने शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यलयासमोर शेतकरी, हमाल, मापाडी, कष्टकरी, लोकांना अल्पदरात पोटभर जेवण मावळा थाळी या नावाने सुरू करण्यात आली त्याचा शुभारंभ आमदार प्रशांत बंब यांनी आज केला.
लासुर स्टेशन येथील काही ध्येयवेड्या युवकांनी एकत्र येत मावळा प्रतिष्ठान च्या माध्यमातून कोरोना काळातील लॉकडाऊनच्या काळात तब्बल तीन महिने लासुर स्टेशनसह परिसरातील गरीब लोकांना घरपोहच कॉल ऑन फूड योजनेद्वारे जेवणाचे डब्बे पोहच केले त्यामुळे भुकेल्या लोकांना मावळा प्रतिष्ठान म्हणजे आशेचा किरण होता व अत्ता लॉकडाऊननंतर बाजार समितीच्या आवारात शेतकरी,कष्टकरी,हमाल,मापारी,यांच्यासाठी फक्त दहा रुपयात पोटभर जेवण योजना असणारी मावळा थाळी म्हणजे भुकेल्या लोकांसाठी अन्नपूर्णा असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत यांनी उदघाटनप्रसंगी केले.
याप्रसंगी उपसरपंच संपत शेठ छाजेड, सभापती संभाजी पाटील डोणगावकर, उपसभापती दादा जगताप, सरपंच मीनाताई संजय पांडव, बाजार समिती संचालक सुनील पाखरे यांच्यासह सर्व ग्रा.प.सदस्य व कृ उ बा. स.संचालक व मावळा प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांची उपस्थिती होते. आज या मावळा थाळीचा शुभारंभ झाल्यानंतर आमदार प्रशांत बंब, उपसरपंच संपत छाजेड यांनी मावळा थाळीचा स्वाद घेऊन मावळा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.