‘बिग बॉस’फेम मराठी अभिनेत्री सई लोकूर अखेर विवाहबंधनात अडकली आहे. सईने मोठ्या थाटात तिर्थदीप रॉयसोबत लग्न केले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सईच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. सोमवारी सकाळी ९.५४ वाजता सई आणि तिर्थदीप यांचा मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. २९ नोव्हेंबर रोजी सई-तिर्थदीप यांच्या लग्नाचं देवकार्य पार पडलं होतं. त्याचेदेखील फोटो सईने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
तिचे फोटो बघून तिचे चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. 2020 या वर्षात अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. काही दिवसांपूर्वीच सईने तिच्या साखरपुड्याची बातमी दिली होती. तीर्थदीप रॉयदेखील चित्रपट निर्माते आहेत. २ ऑक्टोबर २०२०२ रोजी सई व तीर्थदीप यांचा साखरपुडा पार पडला होता.
सईने शेअर केलेल्या या फोटोत तिचा मराठमोळा लूक पाहायला मिळत आहे. नाकात नथ, केसात गजरा, गळ्यात मोत्यांची माळ, कपाळावर चंद्रकोर असा छान मराठमोळा लूक सईने केला आहे.
सईनं लग्नापूर्वीच्या अनेक विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सईचे लग्न झाल्याचे पाहून सईचे चाहते खूप खुश आहेत. तिच्या फोटोंवर कमेंटचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे