मंत्री महादेव जानकर यांना मातृशोक

7

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांना आज मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री गुणाबाई जगन्नाथ जानकर (वय ९२) यांचे आज वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले आहे .

गुणाबाई जानकर यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील धनगरवाडी आहे. गुणाबाईंनी शिक्षण घेतलेले नसले तरी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. 

त्यांना एकूण तीन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. सातारा जिल्ह्यातील पळसावडे (ता. माण) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती संबंधित कुटुंबीयांनी दिली.

माजी मंत्री महादेव जानकर यांच्या संघर्षाच्या काळात आईने त्यांना साथ दिली. मुलांनी शिक्षण घ्यावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. महादेव जानकर हे मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या बंगल्याच्या शेजारी निवासस्थानी राहण्याची संधी त्यांना मिळाली, त्यांच्या कष्टाचे चीज झाले, अशीच सर्वांनी भावना त्या वेळी व्यक्त केली होत्या.