भाजपशी युती करण्यापेक्षा राजकीय संन्यास घेईल : मायावती

2

भविष्यातील कोणत्याही निवडणुकीत भाजपसोबत युती करणार नाही. असे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटलं आहे. तशी वेळ आल्यास राजकीय संन्यास घेणे पसंद करेन असेही त्यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात येत्या विधान परिषद निवडणुकीत समाजवादी पक्षाचा पराभव करण्यासाठी गरज पडल्यास आम्ही भाजपला पाठिंबा देऊ, असे वक्तव्य मायावती यांनी मागच्या आठवड्यात केले होते. मतदारांनी बसापापासून दूर जावे म्हणून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजप आणि बसपाची विचारसरणी भिन्न आहे. त्यामुळे भाजपशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बसपा सर्व जातीय, सर्व धर्मांचा विचार करतो. जातीयवादी, भांडवलशाही प्रवृत्ती विरोधात मी येथून पुढेही लढा देत राहील असं मायावती म्हणाल्या.