जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? ज्यांचं घर आहे, जे त्या घरात राहत आहेत. ते आरोप करत नाहीत आणि ज्यांचा घराशी काहीच संबंध नाही, ते आरोप करत आहेत.अशी टीका निलेश राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना केली आहे.
निलेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या चौकशीच्या मागणीचा पुनरुच्चार केला. अनिल परब मातोश्रीचे एजंट आहेत. ते या गुन्ह्यात भागीदार आहेत. परब मातोश्रीला पैसे पोहोचवत होते. मातोश्री सुद्धा या गुन्ह्यात आहे. परब हे पाईपलाईनमध्ये आहेत. ते सुटू शकत नाहीत, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीबीआय देशमुखांच्या घरी बाहेरून कागदपत्रे घेऊन गेली होती, असा गंभीर आरोप केला आहे. पाटलांच्या या आरोपाचा भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी समाचार घेतला आहे