बारामती : अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या बारामती तालुक्यातील मोरगाव येथील मयुरेश्वराचे मंदिर बंद आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून हे मंदिर कालपासून बंद आहे .
चतुर्थीला मयुरेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात त्यातच कोरोनाचा वाढतात प्रभाव असल्याने हे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंदिर बंद ठेवण्यात आले असून मंदिर परिसरात भाविकांनी येऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. पहाटे मयुरेश्वराचा अभिषेक व महापूजा करण्यात आली.