भटके-विमुक्तांसाठी लढणाऱ्या तसेच सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडणाऱ्या वैशाली भांडवलकर यांना गीताई फाउंडेशनतर्फे ‘साथी सोनी सोरी यल्गार सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी शेतकऱ्यांचे एक प्रकारे ‘मास लिंचिंग’च होत असल्याचे ठाम मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.
ऑनलाइन शिक्षण मूल्य रुजविणारे शिक्षण होऊ शकत नाही. आदिवासी पाड्यांमध्ये सुविधा उपलब्ध नाही. तेथे कसे देणार ऑनलाइन शिक्षण, देशातील विषमतेमुळे केवळ असे प्रकार घडत आहेत. जोपर्यंत विषमता दूर होणार नाही, तोपर्यंत असे होतच राहणार. शेतकऱ्यांनी रस्ता बंद केला नाही, तर ते त्यांच्यावरील अन्यायासाठी झगडत आहेत.असे विविध असा सवाल त्यांनी केले.
प्रतिबंधात्मक कायदे करण्यासह पुनर्वसनसंदर्भात येत्या काळात लढा उभारणे, भटके विमुक्तांच्या जनगणनेसाठी पुढाकार घेणार असल्याचे ,तसेच सरकार भटके-विमुक्तांच्याप्रति अतिशय उदासीन आहे. या समाजाची नोंददेखील शासनदरबारी नाही. ‘मकोका’चे सर्वाधिक गुन्हे भटके विमुक्तांवरच आहेत. त्यांना आजही गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जाते.पुरस्कारार्थी वैशाली भांडवलकर यांनी सांगितले.
यावेळी माजी उपमहापौर गुरमितसिंग बग्गा, मनोहर आहिरे, अनिता पगारे आदी उपस्थित होते.