जे कोरोनाबाधित ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत, मात्र २४ तासांपेक्षा जास्त कालावधी ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासलेली नाही, अशा रुग्णांना COEP वसतिगृहातील वैद्यकीय निरीक्षण केंद्रात दाखल केले जाणार आहे.
या केंद्रात वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली रुग्णांवर उपचार सुरू राहतील. यात केवळ महापालिकेच्या ‘जम्बो’, ‘नायडू’, ‘बाणेर’ आणि ‘दळवी’ हॉस्पिटमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांनाच इथे दाखल केले जाणार आहे. इतर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना या ठिकाणी दाखल केले जाणार नाही.
COEP च्या वसतिगृहातील या वैद्यकीय निरीक्षण केंद्रात ८० रुग्णांना दाखल करण्याची क्षमता तूर्त निश्चित करण्यात आली आहे. या वैद्यकीय केंद्रामुळे आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.