मेडिकल असोसिएशननं सरकारला पाच दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.पुणे जिल्ह्यातील हजारो केमिस्ट दिवस रात्र रूग्णांची सेवा करण्यासाठी काम करत आहेत.
सरकारने सर्व मेडिकलमधील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही बेमूदत संपावर जाऊ, असा इशारा सुनील शहा यांनी दिला आहे.
सर्व मेडीकल दूकानदारांचं लसीकरण तातडीनं करा, अशी मागणी पुणे जिल्हा मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील शहा यांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री अजित पवारांकडे केली आहे.
पाच दिवसात लसीकरणाचा निर्णय घेतला नाही तर मेडीकल दूकानदार जाणार संपावर, अशी माहिती पुणे जिल्हा मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील शहा यांनी दिली आहे.