दि.८ जुन रोजी मंगळवारी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर ही भेट होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र तरिदेखील राजकीय वर्तुळात या भेटीची चांगलीच चर्चा होते आहे.
केंद्र सरकार विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार हा वाद आपल्यासाठी नविन नाही. महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री नेहमिच केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करीत असतात. शिवसेनेचे काही नेतेसुद्धा केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीत भेदभाव करत असल्याचा आरोप वारंवार करत असतात. तर भाजपकडूनसुद्धा महाविकासआघाडी सरकारसोबतच मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेंना सातत्याने लक्ष केले जात असते.
कोरोनादरम्यान महाराष्ट्राची चांगलीच वातायत झाली होती. महाराष्ट्रात विरोधी पक्षात असणार्या भाजपनेसुद्धा यावरुन ऊद्धव ठाकरे यांना चांगलेच धारेवर धरले होते. मात्र त्यावेळीच मुंबई मॉडेलचे सर्वत्र कौतुक होत होते. पंतप्रधानांनीसुद्धा मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेंचे कौतुक केले होते.
केंद्र विरुद्ध राज्य असा कायम वाद असणार्या दोन्हीकडचे नेतृत्व एकमेकांना भेटणार त्यामुळे सर्वत्र चर्चा होते आहे. मात्र या चर्चेमध्ये महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती, शिथील करण्यात येणारे निर्बंध यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ईतर काय चर्चा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.