स्वप्नालीच्या हातावर रंगली आस्तादच्या नावाची मेहंदी, फोटो झाले व्हायरल

31

सध्या चित्रपटसृष्टीत लग्नसराई सुरू आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. अभिनेता आस्ताद काळे व स्वप्नाली पाटील लवकरच लग्नबंधनात अडकणार असून मेहंदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडले. अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णीनंतर, मानसी नाईक आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर असे अनेक मराठी सेलिब्रिटी नुकतेच लग्नबेडीत अडकले. या महिन्यात आस्ताद आणि स्वप्नाली लग्नाबेडीत अडकणार आहेत.

स्वप्नालीच्या हातावर आस्तादच्या नावाची मेहंदी रंगली असून त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ऋतुजा गोडसेने स्वप्नालीचे हे सुंदर फोटोशूट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आस्ताद व स्वप्नालीच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत होते. आता या दोघांच्या लग्नाची उत्सुकता चाहत्यांनाही लागली आहे.

स्वप्नालीच्या मेहंदी सेरेमनीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये स्वप्नाली हिरव्या रंगाच्या आऊटफिटमध्ये आहे. गळ्यात फुलांचे सुंदर दागिने आणि तिच्या चेह-यावर गोड हसू आहे. मराठी बिग बॉसमधून अभिनेता आस्ताद काळे याची लव्हस्टोरी जगासमोर आली होती. अभिनेत्री स्वप्नाली पाटीलसोबतच्या रिलेशनशिपची कबुली त्याने बिग बॉस मराठीमध्ये दिली होती.

आस्ताद आणि स्वप्नाली ‘व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. विशेष म्हणजे थाटामाटात विवाहसोहळा न करता दोघांनीही कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नकार्यावर भरपूर पैसा खर्च न करता नंतर काही महिन्यांनी मोठ्या ट्रिपला जायचा या दोघांचा प्लॅन आहे.