पराभवानंतर दिवस पालटले, मेलेनिया वहिनी डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देणार ?

6

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक सध्या जगभरात चर्चेत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून विजयी ठरले आहेत. लवकरच बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्विकारतील.

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी विजयी होण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांना परभावनानंतर आणखीन एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जो बायडेन यांच्या विजयाने ट्रम्प यांच्या कौटुंबिक जीवनात देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय.

डोनाल्ड ट्रम्प यांना मेलेनिया ट्रम्प घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. स्टेफनी वोल्कॉफनच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की, डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांच्यात १५ वर्षापासून सुरु असलेलं नातं संपुष्टात येत आहे. दोघांच्या नात्याला तडा गेला आहे. डेल मेल या वृत्तपत्रानं हे वृत्त दिलं आहे. मेलेनिया ट्रम्प यांच्या एका पूर्व सहयोगीच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.