कोविड-१९ टास्क फोर्सच्या सदस्यांनी केंद्र सरकारला राष्ट्रीय लॉकडाउन लागू करण्याचे केले आवाहन

27

कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता कोविड -१९ टास्क फोर्सच्या सदस्यांनी केंद्र सरकारला राष्ट्रीय लॉकडाउन लागू करण्याचे आवाहन केलं आहे.’द संडे एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, देशात सध्या कोरोनाच्या संक्रमणात वेगाने वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक आहे.

कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता या अधिकाऱ्यांनी बर्‍याच बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये जे काही ठरलं त्याविषयीची माहिती टास्क फोर्सचे अध्यक्ष व्ही. के. पॉल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली. “केंद्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सचा गेल्या काही महिन्यांपासून हेच सांगण्याचा प्रयत्न आहे की आपण देशभरात लॉकडाउन लावायला हवा. 

 त्या त्या राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या स्वरुपात निर्बंध लावण्याऐवजी राष्ट्रीय लॉकडाउनची गरज आहे. कारण कोरोना सगळीकडे पसरायला लागला आहे, असं टास्क फोर्सच्या सदस्यांनी सांगितलं.