पुण्यात व्यापारी वर्ग आक्रमक

4

पुण्यात मंगळवारी सकाळी लक्ष्मी रस्त्यावर अनेक व्यापारी राज्य सरकार व प्रशासनाच्या निषेध व्यक्त करणाऱ्या फलकांसह रस्त्यावर घोषणाबाजी केली.यावेळी अनेक व्यापारी वर्गाने गर्दी करत प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

राज्य सरकारने किराणा औषधे वगैरे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद म्हटले आहे. महापालिका आयुक्तांच्या आधीच्या परिपत्रकात दुकाने खुली राहतील असे होते.

काही हजार दुकाने व किमान लाखभर कर्मचारी यांची तर.सरकार दैना करत आहेच, शिवाय खरेदीची गरज असणाऱ्या नागरिकांनाही त्रास देत आहे अशी टीका करण्यात आली.

कोरोनावरून सरकारने जाहीर केलेल्या बंदचा लक्ष्मी रस्त्यावरील व्यापार्यांनी मंगळवारी सकाळी निषेध केला. सरकार अनावश्यक बंद घोषित करून दुकानदार व कामगारांच्या जगण्यावरच गदा आणत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.