कॅन्सर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडाच्या चाव्या पवारांच्या हस्ते सुपूर्द

19

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईच्या टाटा स्मारक कॅन्सर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या अधिवासासाठी नजीकच्या म्हाडा इमारतींमधील खोल्या तात्पुरत्या स्वरूपात द्याव्यात अशी सूचना केली होती.

त्यानुसार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सक्रियतेने मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीने १०० खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला.

आज शरद पवार यांच्या हस्ते या खोल्यांच्या चाव्या टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी रुग्णालयाचे उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे तसेच म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर व गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास उपस्थित होते.