मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि गुगल चे सीईओ सुंदर पिचाई यांनीही भारताला मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.अनेक भागांमध्ये आवश्यक सुविधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. भारतातील हे चित्र पाहता अनेक मित्र राष्ट्रांनी देशाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
भारतातील सद्य स्थिती पाहून फार दु:खी आहे. अमेरिकेच्या सरकानं मदतीसाठी पुढाकार घेतल्याचा मला आनंद आहे’, मायक्रोसॉफ्ट सर्व प्रकारच्या मदतीसाठी हातभार लावणार असल्याचं सांगत क्रिटिकल ऑक्सिजन कंसन्ट्रेशन डिवाइस खरेदी करण्यासाठीही आधार देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.अस सत्या नडेला यांनी ट्विट करत सांगितले आहे.
सुंदर पिचई यांनी भारताती ल परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत 135 कोटी रुपयांची मदत केल्याचं जाहीर केलं. युनिसेफच्या माध्यमातून हा निधी वैद्यकिय संसाधनांचा पुरवठा आणि उतर सर्व मदतीसाठी केला जाणार आहे.