सुपर संभाजीनगरला एमआयएमचा विरोध; इम्तियाज जलील म्हणाले…

18

स्मार्ट सिटीच्या कॅम्पेनिंग अंतर्गत संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्यामुळे औरंगाबादेत वादाला सुरुवात झाली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराचं पूर्वीचं नाव असलेलं खडकी, तसेच औरंगाबादचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामध्ये आय लव्ह औरंगाबाद, लव्ह प्रतिष्ठान, लव्ह खडकी असे डिस्प्ले लावून सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत.

शिवसेना आमदार आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठानने शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ “सुपर संभाजीनगर” फलक लावण्यात आला आहे. यावरून एमआयएम चे खासदार इम्तियाज जलीलानी शिवसेनेवर टीका केली आहे.

सुपर संभाजीनगर या फलकावरुन एमआयएमने शिवसेनेवर टीका करत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे. पाणी, रस्ते, वीज अशा गोष्टींची गरज असताना निवडणुकीच्या तोंडावर अशा गोष्टी शिवसेना करते असं जलील यांनी म्हटलं आहे.  इम्तियाज जलील यांनी ट्विटरवर पोस्ट टाकत शिवसेना चीप राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.