गृहराज्यमंत्री सतेज पाटलांना कोरोनाची लागण

14

गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वेग मंदावत असताना पाटलांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंबंधी स्वत: पालकमंत्री पाटील यांनी आपल्या अधिकृत फेसबूक पेजवरून ही माहिती आहे.

तसेच, त्यांनी ‘माझी कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन.’ असे ट्विट केले आहे. सतेज पाटील परदेश दौऱ्यावरून आल्यावर कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, कोल्हापूर दक्षिणचे काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले आहेत. ऋतुराज हे शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू, तर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचे चिरंजीव. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे ते पुतणे आहेत. सतेज पाटलांनी गेल्या वर्षी धडाक्यात आपल्या पुतण्याचे लाँचिंग केले होते.