मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं कोरोनाने निधन

31

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या संसर्ग वाढत आहे. कोरोनामूळे सर्वसामन्यांप्रमाणे राज्यकर्त्यांनादेखील धसका बसला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार देखील चालू होते. मात्र, आता त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

आज सकाळी १० वाजता एकनाथ गायकवाड यांचं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु होते. एकनाथ गायकवाड हे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते. एकनाथ गायकवाड यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत अत्यंसंस्कार होणार आहेत.

एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद सांभाळलं होतं. एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. त्यानंतर दोनवेळा ते दक्षिण मध्य मुंबईतून विजयी झाले होते. काँग्रेसचे दमदार नेते अशी एकनाथ गायकवाड यांची ओळख होती.