नागद येथील ग्रामपंचायत ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीची स्थापना १९५८ मध्ये झाली असून यामध्ये पांगरा, पांगरा तांडा, रामपुरा या गावांचा समावेश आहे. नागद ग्रुप ग्रामपंचायतीवर आतापर्यंत आप्पासाहेब नागदकर सुरेशदादा पाटील तसेच माजी आमदार नितिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. विद्यमान आमदार उदयसिंग राजपूतविरुद्ध माजी आमदार नितीन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
निवडणुकीत नागद येथील चार प्रभागामधून उदयसिंग राजपूत यांचे सहा व माजी आमदार नितिन पाटील यांचे सहा सदस्य निवडुन आले होते.प्रभाग क्रमांक पाच पांगरा पांगरातांडा, रामपुरा येथून निवडून आलेल्या तीन सदस्यांनी नितीन पाटील यांच्या पॅनलला पाठिंबा दिल्यामुळे नितीन पाटील यांचे वर्चस्व प्रस्थापित राहिले होते.
परंतु गेल्या निवडणुकीत उदयसिंग राजपूत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते व आमदारपदी नव्हते. परंतु त्यांच्याकडे आमदारपद असल्याने ते नागद ग्रुप ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. तर माजी आमदार नितीन पाटील यांनी सुद्धा ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.