विधानसभा निवडणुकीमधील उट्टे काढण्याच्या उद्देशाने आता नेतेमंडळी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडताना पाहायला मिळतात. आगामी काळात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले विरुद्ध आमदार शशिकांत शिंदे असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता दिसत आहे.
मी देखील भाऊसाहेब महाराजांचा मुलगा आहे, हे त्यांनी विसरू नये. ज्या उदयनराजेंना लोक घाबरतात, त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून मी निवडून आलेला आहे. मी कुणालाही घाबरत नाही. मी संपलो तरी चालेल पण माझ्या वाकड्यात शिरनाऱ्यांना मी संपवल्याशिवाय राहणार नाही,’ असे शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले होते.
माझ्या मागं मला कोण त्रास देत असेल तर त्याला समोर जाऊन मी संपवणार. काटा काढण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर मी सुद्धा काट्याने काटा काढेन. कोणी आडवे असेल तर मी पण आडगा आहे.
- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले
जिल्हा मध्यवर्ती बँकेचा बिगुल वाजण्याआधीच विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या तसेच टीका-टिप्पणीच्या फैरी झडू लागल्या आहेत.
‘सातारा तालुक्यातील संघर्ष टाळण्यासाठी आम्ही भाऊ एकत्र आलो, हे कोण काहीजणांना सोसत नाही, त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आहे. हीच मंडळी उदयनराजेंच्या आणि माझ्या कानाला लागून आमच्यात वाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असेही ते म्हणाले आहेत .